!-- afp header code starts here -->

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघे जाळ्यात


Three arrested while transporting teak wood in Waghzira forest area यावल (17 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील वाघझिरा वनकक्षात सागवान लाकूड तोड करून वाहतूक करताना तिघांवर वनविभागाने कारवाई केली. या कारवाईने लाकूड तस्करांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

गस्तीदरम्यान वनविभागाची कारवाई
नियतक्षेत्र वाघझिरा, ता.यावल येथील वनविभागाच्या कक्ष क्रमांक 147 मध्ये शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी वाघझिरा राऊंड स्टाफ सह वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना साग प्रजातीचे झाडांची तोड करून चौपट तयार करून मोटरसायकलवरून नेतांना त्यांना तिघे दिसले. त्यांनी पाठलाग केल्यानंतर संशयीत आरोपी सुशील केशराम पावरा (रा.चिखली, ता.वरला) आढळला तर अन्य दोघे सागवान चौपट फेकून पसार झाले.

एक हजार 914 रुपये किंमतीचे सागवान चौकट जप्त करण्यात आली तर 22 हजार 658 रुपयांचे इतके नुकसान केल्याचे आढळून आले. याबाबत वनपाल वाघझिरा यांनी गुन्हा दाखल केला. प्रारंभी आरोपी सुशील केशराम पावरा यास न्यायालयात हजर केले त्यास वन कोठटी 18 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली तसेच पसार संशयीत संजय गेंदा पावरा (वाघझिरा, ता.यावल) व परशुराम तेरसिंग पावरा (वाघझिरा, ता.यावल) या दोघांना देखील अटक करण्यात आली.

संशयीतांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, जगदीश बारेला, चेतन शेलार, अशोक राठोड यांनी केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !