!-- afp header code starts here -->

जळगावात पोलिसांच्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावर 1.33 कोटींचा अपहार : पोलिस उपनिरीक्षक पसार


जळगाव (18 फेब्रुवारी 2026) : जिल्हा पोलीस दलाच्या मालकीच्या दक्षता पेट्रोल पंपावर तब्बल एक कोटी 33 लाख 752 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिस दलातील उपनिरीक्षक असलेल्या व्यवस्थापकाने हा अपहार केल्याने संशयीत वाल्मिक वाघ विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

पंपावरील रक्कम हडपली
दक्षता पेट्रोल पंपावर 1 एप्रिल 2025 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून जमा झालेली एक कोटी 33 लाख 752 रुपयांची रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक होते
मात्र, संशयित आरोपी वाल्मीक वाघ (रा.जळगाव) याने ही रक्कम पंपाच्या अधिकृत बँक खात्यात भरली नाही. ही अवाढव्य रक्कम त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पंपाची आणि मालकाची मोठी फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप उत्तमराव पाटील (46) यांनी फिर्याद दिल्यावरून फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

अपर अधीक्षकांकडून पाहणी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सायंकाळी 7 ते रात्री 9:15 दरम्यान घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !