एक लाखांची लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह फौजदार एसीबीच्या जाळ्यात
two police officers caught taking bribe in malad-mumbai मुंबई (18 फेब्रुवारी 2026) : गुन्हा नोंद केल्याच्या मोबदल्यात एक लाखांची लाच घेताना मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह फौजदाराला एसीबीने अटक केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संजीव तावडे असे अटकेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव असून ते कुरार पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत तसेच त्यांच्यासोबत एका फौजदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणात तक्रारदार वकील असून त्यांचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी तीन लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल करताना पोलिस अधिकार्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली मात्र उर्वरित एक लाखांची रक्कम बुधवारी घेताना एसीबीच्या टीमने रंगेहात अटक केली. दरम्यान, ‘एबीपी माझा’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.







