!-- afp header code starts here -->

तंबाखूसह पानमसाल्याची लक्झरीतून वाहतूक : शिरपूर तालुका पोलिसांकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त


Luxury transportation of tobacco and pan masala : Shirpur taluka police seize goods worth three lakhs शिरपूर (18 फेब्रुवारी 2026) : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या तंबाखूसह पानमसाल्याची लक्झरीतून इंदौरहून पुण्याकडे वाहतूक होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत तीन लाख 19 हजार 510 रुपयांचा साठा जप्त केला तसेच 20 लाख रुपये किंमतीची लक्झरी जप्त करण्यात आली. या कारवाईने तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक-52 वरुन लक्झरी बस क्रमांक (एम.पी.44 झेड.एफ.3758) द्वारे इंदौरहून पुण्याकडे प्रतिबंधीत पानमसाल्याची वाहतूक होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून बुधवार, 18 रोजी पहाटे वाहनातून विविध कंपनीचा पानमसाला तसेच तंबाखू मिळून तीन लाख 19 हजार 510 रुपयांचा साठा जप्त केला तसेच 20 लाख रुपये किंमतीची लक्झरी जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्झरी बस चालक महेंद्र अनाराम चौधरी (34, वॉर्ड नं. 9 मुनदियार, ता.जि.नागोर, राजस्थान) सह अज्ञात माल टाकणारा व माल उतरणार्‍याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चालकाला अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक सुनील वसावे करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मनोज कचरे, सुनील वसावे, किशोर चव्हाण, संतोष पाटील, संदीप ठाकरे, अनिल चौधरी, राजू ढिसले, योगेश मोरे, विजय ढिवरे, स्वप्नील बांगर, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, भूषण पाटील, रणजीत देशमुख आदींच्या पथकाने केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !