संयम, प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा रमजान महिना
शेख काबीज
जळगाव (19 फेब्रुवारी 2026) मुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र मानला जाणारा रमजान महिन्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. चंद्रदर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजानचे स्वागत केले. पहाटेच्या सहरीपासून उपवास (रोजा) सुरू होत असून दिवसभर संयम, प्रार्थना आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा हा महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे सहरी करून दिवसभर उपवास पाळतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करून रोजा सोडतात. मशिदींमध्ये विशेष नमाज पठण, कुरआन वाचन आणि इबादत करण्यात येते. या महिन्यात दानधर्म, गरजूंना मदत आणि मानवतेची सेवा करण्यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे समाजात बंधुभाव, प्रेम आणि एकतेचा संदेश अधिक दृढ होतो.

आत्मपरीक्षण सदाचार अंगीकारण्याचा काळ
रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून आत्मपरीक्षण, संयम आणि सदाचार अंगीकारण्याचा काळ असल्याचे धर्मगुरूंनी सांगितले. महिनाभर चालणार्या या पवित्र साधनेनंतर ईद-उल-फित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पवित्र महिन्यानिमित्त मुस्लिम समाजात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शांतता, सद्भावना आणि परस्पर प्रेमाचे चित्र पाहायला मिळत आहे. रमजान मुबारकच्या शुभेच्छांनी वातावरण भारावून गेले आहे.
रमजान करीम (पवित्र रमजान महिना)
या पवित्र रमजान महिना आपल्या सहकार्यांसोबत/आपल्या अधीनस्थ कर्मचार्यांसोबत विनम्रता, दयाळूपणा, सहानुभूति शिकवतो. हा पावन महीना आपल्याला संयमी बनवतो. या पवित्र रमजानमध्ये रोजा ठेवला जातो, रोजा म्हणजे फक्त भुकेले, तहानेले राहणे नाही. शरीराच्या प्रत्येक अंगाचा रोजा असतो.
डोळ्यांनी अपवित्र कार्य, जसे परस्त्रीला पाहणे. जिभेने शिव्या, कुणाचे मन दुखावणारे वक्तव्य करणे, खोटे बोलण्यास रोजा रोखतो. प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मापासूनही रोजा रोखतो. आपल्या वर्षाचे 11 महिने पवित्र कार्य करताना कसे घालवले याचा अभ्यास करायला लावतो. या पावन महिन्यात अल्लाहने आपले नबी, प्रेषित मोहम्मद सल्लाहुअलैहि व सल्लम पर पवित्र कुरआन नाजिल केला होता. जो संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणा प्रदान करतो. म्हणून या पवित्र रमजानमध्ये सर्व कुरआन मजीद की तिलावत (पठन) करतात. अल्लाह (ईश्वर) ी त्यामुळे विशेष कृपा प्राप्त होते.







