भुसावळातील एन.के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated with enthusiasm at N.K. Narkhede English Medium School in Bhusawal भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गुरुवार, 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या पदाधिकार्यांची उपस्थिती
संस्थेचे सचिव पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईट सेंक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.

शाळेतील शिक्षिका सीमा चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







