छत्रपती शिवाजी महाराज जगात आदर्श राजा : प्राचार्य डॉ.रमेश जोशी
Chhatrapati Shivaji Maharaj is an ideal king in the world: Principal Dr. Ramesh Joshi भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांसाठी आदर्श आहेच परंतु संपूर्ण जगात देखील ते एक आदर्श व प्रजादक्ष राजा म्हणून ख्यातिप्राप्त आहेत. असा आदर्श राजा घडवण्यात जिजाऊ मातेचे महत्वपूर्ण योगदान असून छत्रपतींनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते कृतिशील युगपुरुष होते. असा प्रजा पालन करणारा राजा पुन्हा होणे नाही, यांचे नाव घेतल्याबरोबर सर्वांच्या माना आपोआप झुकतात, असे विचार प्राचार्य डॉक्टर रमेश जोशी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्न श्री संत
गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व प्राध्यापकांनी देखील भावसुमने अर्पण करून अभिवादन केले.

डॉ.सुधीर शर्मा, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा हितेश गुप्ता, अनुराग साळुंखे, बद्री प्रसाद केवट, कोमल भट व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते.







