पिंपळनेरात साखरपुड्यात भाऊबंदकी भिडली : चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू, एक गंभीर
Siblings clash in Pimpalnerat over sugarcane : Three killed, one critically injured in knife attackपिंपळनेर, ता.साक्री (19 फेब्रुवारी 2026) : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्न कार्यात सुरू असलेला शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. क्षणार्धात मंडपातच दोन गट भिडल्यानंतर चाकूचा सर्रास वापर करण्यात आल्याने या घटनेत तीन जणांचा मृत्यू ओढवला तर एक जण गंभीर जखमी झाला. गुरुवारी दुपारी एक वाजता घडलेल्या या धक्कादायक घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. खुनानंतर पसार होण्याच्या प्रयत्नानंतर तीन संशयीतांना सतर्क नागरिकांच्या मदतीने पकडण्यात यंत्रणेला यश आले.
आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओने वाढवला तणाव
पिंपळनेरात एका कुटूंबात लग्न असल्याने लग्न घर गजबजले होते मात्र हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटली असतानाच कुठल्यातरी कारणावरून वाद वाढला व दोन गट यावेळी भिडले.

तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
संशयीतांनी यावेळी धारदार चाकूने हल्ला केल्यानंतर सुरेश गोसावी (50), साहिल गोसावी (35) व देवेंद्र पवार (36) यांचा मृत्यू ओढवला तसेच पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. लग्नसोहळ्यातील घडलेल्या रक्तरंजित हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी पळताना ग्रामस्थांची सतर्कता
तीनही आरोपी बे्रझा कारद्वारे गुजरातकडे पळत असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील गावातील नागरिकांना संदेश देत रस्त्यावर वाहतूक ठप्प करण्यास सांगितले व नागरिक रस्त्यावर जमल्यानंतर ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटात वाहन अडवण्यात आल्यानंतर सोनगड गुजरातच्या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कांतीलाल गोसावी (42), जसवंत गोसावी (36 ) व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करायचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.







