भुसावळातील के.नारखेडे विद्यालयामध्ये शिवजयंती उत्साहात
भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी. पाठक, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील तसेच संगणक विभागासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी आणि विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या शिल्पाकृतीस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पार्थ सपकाळे, गुंजन चौधरी , लावण्या निकम, पार्थ चौधरी या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अमन तडवी, कार्तिक पाटील, योजना पाटील या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील कथांचे अभीवाचन करून जणू काही प्रसंगच समोर उभा केला.

सूत्रसंचालन जान्हवी चौधरी व मोक्षदा भारंबे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी लीना चौधरी, दीप्ती जावळे, स्मिता झांबरे, शुभांगी पाटील यांनी प्रयत्न केले.







