भुसावळात 8 मार्चला महिला क्रीडा मंडळाची निबंध स्पर्धा
जागतिक महिला दिनानिमित्त‘स्मार्ट फोनची साथ की सावट विषयावर उपक्रम
भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ भुसावळतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट फोनची साथ की सावट ?हा स्पर्धेचा विषय असून सहभागींसाठी शब्दमर्यादा 200 शब्दांची ठेवण्यात आली आहे. स्पर्धेची अंतिम तारीख 5 मार्च असून विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थिनी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी प्रभा पाटील (9923631770), विजया निकम (9403988545) तसेच कीरण चौधरी (7020914356) यांच्याशी संपर्क साधावा, असे सचिव लता होसकोटे व प्रोजेक्ट चेअरमन प्रभा पाटील यांनी कळविले आहे.








