!-- afp header code starts here -->

पनवेल-अलीपूरद्वार दरम्यान अमृत भारत साप्ताहिक एक्सप्रेस धावणार

नियमित सेवा 23 फेब्रुवारीपासून होणार सुरू


Amrut Bharat Weekly Express will run between Panvel-Alipurduar भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : मध्य रेल्वे द्वारा पनवेल-अलीपूरद्वार -पनवेल अमृत भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान यांनी अलीकडे आयोजित कार्यक्रमात या गाडीच्या उद्घाटन फेरीस हिरवा झेंडा दाखवला होता. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून जाणार आहे, यामुळे प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
पनवेल-अलीपूरद्वार-पनवेल अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) ही गाडी 11031 सोमवार, 23 फेब्रुवारीपासून पनवेल येथून दर सोमवारी 11.50 वाजता सुटेल व अलीपूरद्वार येथे तिसर्‍या दिवशी 1.50 वाजता पोहोचेल. गाडी 11032 गुरुवार, 26 फेब्रुवारीपासून अलीपूरद्वार येथून दर गुरुवारी सकाळी 4.45 वाजता सुटेल व पनवेल येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 5.30 वाजता पोहोचेल. अत्यंत सुपरफास्ट गाडी असून या गाडीमुळे भुसावळसह जळगाव येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार आहे. या गाडीला 8 शयनयान, 11 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 पॅन्ट्री कार व 2 सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे आहे. या गाडीचे आरक्षण 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

या स्थानकावर गाडीला थांबे
या गाडीला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, बरगढ, प्रयागराज छिवकी, मेजा रोड, मिर्झापूर, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, बरसोई, किशनगंज, अलुआबारी रोड, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी, बिन्नागुडी व हासीमारा येथे थांबणार आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !