दहावी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज : भुसावळसह ग्रामीणमध्ये चार हजार 914 विद्यार्थी प्रविष्ट
Administration ready for 10th exam: 4,914 students admitted in rural areas including Bhusawal भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : दहावीची परीक्षेला शुक्रवार, 20 पासून सुरूवात होत आहे. यंदा भुसावळ शहर आणि ग्रामीण भागातील एकूण 11 केंद्रांवर चार हजार 914 विद्यार्थी आपले नशीब अजमावत आहेत. यंदाची परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर प्रशासनासाठीही मोठी कसोटी ठरणार आहे. ‘कॉपीमुक्त’ अभियानांतर्गत प्रत्येक वर्गखोलीवर आता झूम मीटिंगद्वारे थेट मंत्रालयापासून ते स्थानिक शिक्षण विभागापर्यंत ‘डिजिटल नजर’ ठेवली जाणार आहे. शहरात तीन हजार 180 तर ग्रामीण भागात 1 हजार 735 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील.
शहरात सात केंद्र
भुसावळ शहरातील सात केंद्रांवर तीन हजार 180 तर ग्रामीणमधील चार केंद्रांवर 1 हजार 735 विद्यार्थी परीक्षा देतील. शिक्षण विभागाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील सातही शाळामध्ये परीक्षा केद्रे असल्याने गुरूवारपर्यत परीक्षार्थींचे नंबर टाकले जाणार आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केद्रांच्या बाहेर विद्यार्थ्यांसाठी नंबर लावले जाणार आहे. शुक्रवारी सुरू होत असलेल्या परीक्षेला विद्यार्थ्यांची तयारी आहे.

या अधिकार्यांची नियुक्ती
दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण बोर्डाने बी.डी.धाडी यांची तर वरणगाव विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांची कस्टोडीयन म्हणून नियुक्ती केली आहे. ज्याप्रमाणे संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त असतो, त्याच धर्तीवर प्रत्येक केंद्रावर ‘बैठे पथक’ तैनात करण्यात आले आहे. हे पथक पेपर सुरू होण्यापूर्वी केंद्रावर दाखल होईल आणि शेवटची उत्तरपत्रिका जमा होईपर्यंत केंद्रावरून हलणार नाही. पेपरच्या काळात विविध भरारी पथके परीक्षा केंद्रांवर येऊन पहाणी करणार आहे. सीसीटिव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून सुध्दा नजर ठेवली जाणार आहे.
शहरातील मुख्य केंद्रे
बीझेड उर्दू हायस्कूल 681 विद्यार्थी (सर्वात मोठे केंद्र), सेंट अलायसिस विद्यालय 856 विद्यार्थी, म्युनिसिपल हायस्कूल 439 विद्यार्थी, डीएल हिंदी हायस्कूल 410 विद्यार्थी, बियाणी माध्यमिक विद्यालय 369 विद्यार्थी डीएस हायस्कूल 224 विद्यार्थी, संत गाडगे महाराज विद्यालय 201 विद्यार्थी यांची व्यवस्था केली आहे. ग्रामीण भागातील परीक्षा केद्रे वरणगाव आणि वराडसीम परिसरातील 4 केंद्रांवर 1735 विद्यार्थी सज्ज आहेत. यात महात्मा गांधी विद्यालय (547) आणि सर्वोदय माध्यमिक विद्यालय (455)







