!-- afp header code starts here -->

भुसावळात श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान पदयात्रेचे स्वागत

400 हून अधिक भाविकांची उपस्थिती : बैरागी बाबा पंजाबी यांचे नेतृत्व


भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ आयोजित श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे बुधवार, 18 फेब्रुवारी रोजी भुसावळ नगरीत आगमन झाले.श्रद्धानगर येथील महानुभाव आश्रमातून पदयात्रेला सुरुवात होऊन शहरातील काशीनाथ लॉज परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी स्वागतासाठी महिलांची अधिक संख्या होती.

चारशेहून अधिक भाविक सहभागी
काशीनाथ लॉजपासून सकाळी श्रध्दा नगरातील महानुभाव आश्रमापासून निघालेली ही पदयात्रा शहरातील काशीनाथ लॉजजवळ आल्यावर तेथून स्वागत करण्यात आले. पदयात्रेत सुमारे 400 हून अधिक भाविकांच्या उपस्थितीत जयघोष व भक्तिमय वातावरणात पदयात्रा म्युन्सीपल पार्क येथील श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली.पदयात्रेचे नेतृत्व बैरागी बाबा पंजाबी यांनी केले. श्रीकृष्ण मंदिर आराध्य प्रतिष्ठानतर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी समाज प्रबोधन, नैतिक मूल्यांची जपणूक आणि अध्यात्मिक एकात्मता यांचा संदेश देण्यात आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !