तीन लाखांचे लाच प्रकरण : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनातून सहा लाखांचे घबाड जप्त
Bribe case of three lakhs: Rs. six lakhs seized from senior police inspector’s office मुंबई (19 फेब्रुवारी 2026) : गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरूवातीला दोन लाख रुपये स्वीकारून उर्वरीत एक लाखांची लाच घेताना मालाड परिसरातील कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे व उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना मुंबई एसीबीने रंगेहाथ अटक केली होती संशयीतांना गुरुवारी 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
फिर्यादी वकीलाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकार्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती मात्र उर्वरित एक लाखाची रक्कम आज घेताना एसीबीच्या टीमने दोन्ही पोलिसांना रंगेहात अटक केली.

झडतीत आढळले लाखोंचे घबाड
विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात कारवाईत अटक करण्यात आलेल्या कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या कॅबिनमध्ये सहा लाख 34 हजारांची रोकड आढळल्याने ती जप्त करण्यात आली. ही रक्कम एसीबीने जप्त केली.
संशयीतांना 23 पर्यंत कोठडी
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची दाट शक्यता व्यक्त करत सखोल तपास करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची एसीबीची मागणी होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.







