यावल शहरात धाडसी घरफोडी : सोन्याच्या दागिण्यांसह सहा लाखांचा ऐवज लांबवला
Daring house burglary in Yaval city: Gold ornaments and valuables worth Rs. 6 lakhs stolen यावल (19 फेब्रुवारी 2026) : यावल शहरातील विस्तारीत भागात विरार नगरातील कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधत साडेपाच लाख रुपयांच्या रोकडसह 38 हजार रुपये किंमतीचे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोने लांबवले. या प्रकारणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला टार्गेट
यावलच्या बुरुज चौकात बर्हाणपूर जिलेबीवाला म्हणून व्यवसाय करणारे शेख साबीर शेख प्यारेसाहब हे शहराच्या फैजपूर रस्त्यालगत असलेल्या विस्तारित भागात विरार नगरात कुटुंबीयांसोबत राहतात. ते सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी कुटुंबीयां समवेत बर्हाणपूर येथे आई-वडिलांच्या भेटीसाठी गेले होते. ते 17 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता यावल येथे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजासह ग्रीलचे कुलूप तुटलेले दिसले तसेच घरातील लोखंडी कपाटाचे कुलपे तोडून सामान अस्ताव्यस्त दिसून आला. यावेळी त्यांनी त्यांचे कपाट तपासले असता कपाटातील साडेपाच लाखांची रोकड व पत्नीचे 38 हजार रुपये किंमतीच्या साडेसहा ग्राम वजनाच्या सोन्याचे कानातील रिंगा असा पाच लाख 88 हजार रुपये किंमतीचा माल चोरीला गेल्याचे निर्दशनास आले.

पोलिसांची धाव
घटनास्थळी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे पथकासह दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी शेख साबीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, कॉन्स्टेबल सागर कोळी करीत आहे.







