भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ (20 फेब्रुवारी 2026) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्कुलच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रसंगी सातवीचा विद्यार्थी निनाद चौधरी याने छत्रपती शिवाजी महाराजां विषयी माहिती सांगितली तर इयत्ता चौथीच्या विधिका शंकपाल या विद्यार्थिनीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर पोवाडा गायीला.

सातवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादरीकरण केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या. यात जिजामाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज, मावळे व अफजलखान यांच्यावर नाटकाचे सादरीकरण केले. यावेळी शाळे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभुषेत विद्यार्थ्याला घोड्यावर बसवून शाळेच्या परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
प्रसंगी प्रिंसीपल निना कटलर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या मनप्रीत कौर, श्रध्दाली घुले तसेची सोनाली मुजुमदार, स्मिता जाधव, अर्जुन सनस, सोनिया टेकवाणी, मोहम्मद अकीब, जेम्स फ्रांन्सीस, युवराज जाधव, अनघा पाटील, मुकेश कोळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माया सोनोने व शीतल बुला यांनी तर आभार निना कटलर यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







