भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात
भुसावळ (20 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त शाळा परिसरात भव्य मिरवणूक काढत लेझीम व झांजच्या तालावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि देशभक्तीपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावाही सादर करण्यात आला. या देखाव्यामुळे शिवरायांचे पराक्रम, स्वराज्याचा इतिहास आणि जिजाऊंचे संस्कार विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. मिरवणुकीत मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, नगरसेविका सोनल महाजन, रजनी सावकारे, राजीव पारिक, प्रवीण भराडिया, प्राचार्य डी.एम.पाटील यांच्यासह शिक्षक-पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








