!-- afp header code starts here -->

भुसावळातील 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार : आरोपीला अटक


22-year-old girl raped in Bhusawal: Accused arrested भुसावळ (20 फेब्रुवारी 2026) : शहरातील एका भागात 22 वर्षीय युवतीवर 55 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयीताविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

असे आहे प्रकरण
अत्याचाराची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.45 ते 4.30 या वेळात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी सांगितले की, शहर पोलिसात या गंभीर प्रकारानंतर 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9.15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला व संशयीत राजू लालू गायकवाड (55, रा.भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 351(2), 127(2) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पीडीत युवतीने दिलेल्या तक्रारीवरून संशयीत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !