श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे भुसावळात शिवजयंती उत्साहात
Shiv Jayanti celebrated in Bhusawal by Shri Rashtriya Rajput Karni Sena भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : भुसावळ शहरातील महेश नगरातील मुक्तीधाम येथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हाध्यक्षा सारिका राजपूत यांनी आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीने जसे आई जिजाऊने शिवरायांना लहान पणापासूनच घडविले तसे आपण सुद्धा घराघरात राजे छत्रपती घडवावे, असे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
करणी सेनेच्या जिल्हा सचिव मीना र् राजपूत, भुसावळ तालुकाध्यक्षा कविता राजपूत, श्रद्धा राजपूत, प्रमिला राजपूत, प्रतीक्षा राजपूत, उज्वला राजपूत, भाग्यश्री राजपूत, प्रियंका बोरसे, सपना राजपूत, प्रियंका राजपूत, गायत्री राजपूत, सविता मोरे, सविता पाटील, अर्चना राजपूत व असंख्य महिला उपस्थित होत्या. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणानी संपूर्ण परिसर दुमदूमला.







