!-- afp header code starts here -->

दहावी परीक्षा : भुसावळ शहरासह तालुक्यात 51 विद्यार्थ्यांची दांडी


10th exam : 51 students fail in Bhusawal city and taluka भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : दहावी परीक्षेला शुक्रवार, 20 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्याच मराठीच्या पेपराला शहरासह तालुक्यात 51 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. शहर व ग्रामीण भागातील 12 परीक्षा केंद्रावर मराठीच्या पहिल्या पेपरला शुक्रवारी तीन हजार 979 परीक्षार्थींपैकी तीन हजार 928 परीक्षांर्थी यांनी पेपर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

12 केंद्रावर झाली परीक्षा
भुसावळातील सात तर ग्रामीण भागातील पाच अश्या 12 केद्रांवर पेपर पार पडला. प्रत्येक वर्गात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून झुम मिटिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. कॉपी मुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे

या केंद्रावर झाली परीक्षा
शहरात व ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांमध्ये बी.झेड.उर्दू हायस्कूल 681 विद्यार्थी, सेंट अ‍ॅलॉयसीस विद्यालय 856 विद्यार्थी, म्युनिसिपल हायस्कूल 439 विद्यार्थी, डी.एल.हिंदी हायस्कूल 410 विद्यार्थी, बियाणी माध्यमिक विद्यालय 369 विद्यार्थी, डी.एस.हायस्कूल 224 विद्यार्थी, संत गाडगे महाराज विद्यालय 201 विद्यार्थी यांची येथे व्यवस्था केली होती. ग्रामीण भागातील परीक्षा केद्रे वरणगाव आणि वराडसीम परिसरातील पाच केंद्रांवर व्यवस्था केली होती. यात महात्मा गांधी विद्यालय (547) आणि सर्वोदय माध्यमिक विद्यालय (455), गंगाधर सांडू विद्यालयात परीक्षा झाली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !