चाळीसगावात खळबळ : न्यायालय परिसरात वकीलावर जीवघेणा हल्ला
Excitement in Chalisgaon : Fatal attack on lawyer in court premises चाळीसगाव (21 फेब्रुवारी 2026) : चाळीसगाव न्यायालयाच्या परिसरात वकीलावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार सुरू असतांनाच इतर वकील धावून गेल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून वकीलाची सुटका केली. मात्र या हल्ल्यात वकीलाच्या हाताला गंभीर मार लागला असून उपचारार्थ शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
काय घडले चाळीसगावात ?
अॅड.समीर शेख हे शुक्रवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात न्यायालयीन केसेस संबंधी कामकाज करीत असतांनातीन सात ते आठ जण शेख यांच्याजवळ आले व त्यातील तिघा संशयीतांनी कुठल्यातरी हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच इतर वकील बांधव धावले व त्यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून शेख यांची सुटका केली. या हल्ल्यात शेख यांच्या हाताला जबर मार लागला असून त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.या घटनेने न्यायालय परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
वकिल बांधवांकडून हल्ल्याचा निषेध
चाळीसगाव न्यायालयातील वकील बांधवांनी एकत्र येत अॅड.समीर शेख यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. वकीलांना संरक्षण देणारा कायदा झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, वकीलावरील जीवघेण्या हल्ल्याचे कारण समजून आले नाही.







