चाळीसगावात किरकोळ कारणावरून कोयत्याने वार : दोघांविरोधात गुन्हा


Stabbing by a coyote over a minor reason in Chalisgaon : Case against two चाळीसगाव (22 फेब्रुवारी 2026) : चुकीचे का सांगत आहे? असे बोलल्याचा राग येवून एकाच्या पायावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना करगाव शिवारातील हॉटेलबाहेर घडली. याप्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे हल्ला प्रकरण
गजानन उत्तम चौधरी (रा.नानाश्री नगर, चैतन्यतांडा) हे धुळे रोड, करगाव शिवारातील संगम गार्डन हॉटेलमध्ये बसलेले असताना चुकीचे का सांगत आहे? असे सांगण्याच्या वादातून राग आल्याने राहुल अमृतकार व बंटी साळुंखे याने त्याच्याजवळील कोयत्याने गजानन चौधरी याच्या डाव्या पायावर मारून जबर दुखापत केली.

ही घटना गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 11.10 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गजानन चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित राहुल अमृतकार व बंटी साळुंखे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 118 (1),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !