बारावी परीक्षेत राज्यशास्त्राचा पेपर फुटला : तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे आदेश


Political Science paper leaked in 12th exam : Order to suspend soldier along with three teachers गडचिरोली (22 फेब्रुवारी 2026) : राज्यात बारावी परीक्षेला सुरूवात झाली असताना गडचिरोलीतून मात्र धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यशास्राच्या पेपरादरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून प्रश्नांची उत्तरे चक्क चॅट जीपीटीवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॉपी परीक्षा केंद्रावर आणण्याचा धक्कादायक प्रकार चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर या प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

चार जणांविरोधात गुन्हा
सामूहिक कॅापीचा प्रयत्न करण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान उघडकीस आणला. याप्रकरणी केंद्र प्रमुख आणि इतर दोन शिक्षकांसह शाळेच्या शिपायाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहे. त्या चारही जणांवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. बुधवारख 18 फेब्रुवारी रोजी राज्यशास्र विषयाचा पेपर सुरू असताना सीईओ सुहास गाडे यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर चालू विषयाच्या मायक्रोनोट्स, तसेच राज्यशास्त्र विषयाच्या चालू असलेल्या पेपरचे प्रश्न चॅट जीपीटीवरुन प्रिंट आऊट काढलेले मिळून आले.

सीईओ गाडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा जाब विचारत चौकशी समिती गठीत केली. चौकशी समितीने आपल्या अहवालात सामूहिक कॉपीचा प्रयत्न झाल्याचे नमूद केल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला जबाबदार धरून तीन शिक्षक आणि एका शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !