यावल शहरातील पाच वर्षीय अरफाचा पहिला रोजा
यावल (22 फेब्रुवारी 2026) : रमजानच्या पवित्र महिन्यात उपवासाचे (रोजा) विशेष महत्त्व असते. कडक ऊन आणि दिवसाचा मोठा कालावधी असतानाही यावलमधील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल समद यांची पाच वर्षीय नात अरफा शेखने आपला पहिला रोजा पूर्ण करून ईश्वराप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
अरफा ही यावलची रहिवासी स्वस्त धान्य दुकान चालक शेख तनवीर यांची मुलगी आहे. अत्यंत लहान वय असूनही अरफाने मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने पहाटेपासून सायंकाळपर्यंत अन्न-पाण्याविना राहून आपला हा पहिला रोजा यशस्वी केला. तिची ही चिकाटी पाहून कुटुंबासह परिसरात तिचे भरभरून कौतुक होत आहे.
संध्याकाळी इफ्तारच्या वेळी अरफाचा उत्साह ओसंडून वाहत होता. तिचा पहिला रोजा पूर्ण झाल्याबद्दल आजी, वडील, आई, काका कुटुंबातील सदस्यांनी तिचे अभिनंदन केले. अरफा हेी पत्रकार काबीज शेख यांची पुतणी आहेत लहान वयात मुलांमध्ये असलेले संस्कार आणि धर्माप्रती असलेली ओढ’ याचे अरफा ने एक उत्तम उदाहरण ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.