फेकरीत ‘सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाचे लोकार्पण


Inauguration of Sardar Vallabhbhai Patel Hall in Fekri फेकरी, ता.भुसावळ (23 फेब्रुवारी 2026) : संविधान नगर परिसरातील मोकळ्या जागेवर आमदार निधीतून सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘सरदार वल्लभभाई पटेल सभागृहाचे लोकार्पण मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

ग्रामस्थांची उपस्थिती
या आधुनिक व प्रशस्त सभागृहामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमास गावातील मान्यवर, पदाधिकारी व सरपंच चेतना संजय भिरुड, तालुकाध्यक्ष गोलू पाटील, ग्रामसेवक सचिन पाटील, माजी सरपंच प्रकाश झोपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत निकम, सामाजिक कार्यकर्ते संजय भिरुड, जयवंत भटकर, राजकिरण निकम, निश्चल झोपे, दिलीप पाटील, सुनील ठाकूर, अनिल कवठे तसेच ग्रामपंचायत सदस्य संगीत दिलीप पाटील, कोमल अमोल झोपे, सुवर्णा निलेश बराटे, अतुल चौधरी, शुभम पाटील व विनोद भिरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते फित कापून व पूजन करून सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासात हे सभागृह महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !