महाशिवपुराण कथा स्थळाची प्रांताधिकार्यांकडून पाहणी : सोयी-सुविधांचा आढावा
Provincial authorities inspect Mahashivpuran Katha site : Review of facilities पाडळसे, ता.यावल (23 फेब्रुवारी 2026) : महाशिवपुराण कथेला येथे 10 मार्चपासून सुरूवात होत असून देशभरातून सुमारे तीन लाखांवर भाविक येण्याचा अंदाज आहे. भाविकांची गर्दी पाहता त्यांच्यासाठी विविधांगी सोयी-सुविधा पुरवण्यावर प्रशासन व आयोजकांचा कल आहे. या अनुषंगाने फैजपूरचे प्रांताधिकारी बबन काकडे यांनी कथा स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करीत सुविधा व व्यवस्थेचा आढावा घेतला.
प्रत्येक विभागाला सूचना
प्रांताधिकारी काकडे यांनी स्थळी कथा मंडपाची एकूण जागा, भाविकांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची वेय, अन्नछत्र (जेवण व्यवस्था), वीज आणि वाह नतळ याबाबत सविस्तर माहिती घेतली. भाविकांची गैरसोय होऊ नये माणून प्रत्येक विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाला जवाबदारी सोपवण्यात आली असून या बाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांना देण्यात आला असून लवकरच ते कथा स्थळाची पाहणी करतील.
