पुरनाड वस्तीवर धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास


Daring housebreaking at Purnad settlement ; Property worth Rs 2.5 lakh looted मुक्ताईनगर (24 फेब्रुवारी 2026) : बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरली व चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे दोन लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड वस्तीवर घडली. 22 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या घरफोडी प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
फिर्यादी लक्ष्मण गोविंद दगडे (42, रा.पुरनाड वस्ती) हे आपल्या कुटुंबासह राहतात. 22 फेब्रुवारीच्या पहाटे 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील लाकडी दरवाजाला होल पाडून आतील कडी उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. एकूण दोन लाख 42 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.


पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि मुक्ताईनगर निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !