एअर अॅम्बुलन्स चत्रात कोसळले : रुग्णासह सात जणांचा जागीच मृत्यू
Air ambulance crashes in Chatra : Seven people including patient die on the spot रांची (24 फेब्रुवारी 2026) : गंभीर जखमी असलेल्या रुग्णाला हलवण्यासाठी वापरण्यात येणारे एअर अॅम्बुलन्स विमान
झारखंडहून दिल्लीला येत असताना चत्रामध्ये कोसळले. या अपघातात विमानातील रुग्णासह सात लोकांचा मृत्यू झाला. रेडबर्ड कंपनीचे बीचक्राफ्ट किंग एअर इ90ङ हे एक एअर म्ब्युलन्स होते.

सोमवारी संध्याकाळी 7.11 वाजता विमानाने रांचीहून उड्डाण केल्यानंतर 7.34 वाजता विमानाचा संपर्क तुटला. थोड्या वेळाने विमान झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील समरियाच्या जंगलात कोसळले.
विमानात कॅप्टन विवेक विकास भगत (पायलट), कॅप्टन सबराजदीप सिंग (सह-पायलट), संजय कुमार (रुग्ण), अर्चना देवी (नातेवाईक), धुरू कुमार (नातेवाईक), विकास कुमार गुप्ता (डॉक्टर), सचिन कुमार मिश्रा (पॅरामेडिकल स्टाफ) हे होते.
रांची येथील देवकमल हॉस्पिटलचे सीईओ, अनंत सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, एअर म्ब्युलन्सची व्यवस्था एका रुग्णाने केली होती. ते म्हणाले, लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील रहिवासी असलेले रुग्ण संजय कुमार (41) यांना 16 फेब्रुवारी रोजी 65 टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सिन्हा यांनी पुढे सांगितले की, कुटुंबीयांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला सुमारे 4.30 वाजता रुग्णालयातून दिल्लीसाठी नेण्यात आले. सायंकाळी झालेल्या विमान अपघातात रुग्णासोबत प्रवास करणार्या सर्व लोकांचा मृत्यू झाला.