ट्रम्प इफेक्ट : शेअर बाजार क्रॅश : गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटी स्वाहाः
Stock market crash: Investors lose Rs 6 lakh crore मुंबई (24 फेब्रुवारी 2026) : भारतीय शेअर बाजार मंगळवारी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे सहा हजार कोटी रुपये स्वाहाः झाले. सेन्सेक्स निर्देशांक तब्बल एक हजार अंकांनी खाली आला. बाजारातील आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये झालेल्या तीव्र विक्रीमुळे दबाव वाढल्याचे सांगण्यात आले.
बीएसई सेन्सेक्स 1068.74 अंकांनी घसरला तर निफ्टी 50 मध्ये 288.35 अंकांची घसरण झाल्याने बीएसईवरील कंपन्यांचं बाजारमूल्य 6.3 लाख कोटी रुपयांनी घटले. गुंतवणूकदारांना एका दिवसात 6.3 लाख कोटींचा फटका बसला.

आय.टी.शेअर्सची जोरदार विक्री
आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर अँथ्रोपिक कंपनीनं एआय संदर्भातील नव्या अपडेट आल्यानं आयटी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. अँथ्रोपिकनं क्लाउड कोड टूल लाँच केल्याने आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात निफ्टी आयटी निर्देशांक 20 टक्यांनी घसरला आहे.
वॉल स्ट्रीटवरही घसरण
जागतिक बाजारांचा विचार केला असता अमेरिकन बाजार वॉल स्ट्रीटवर जोरदार घसरण पाहायला मिळाली. आशियातील बहुतांश बाजारात फार तेजी नव्हती. ट्रम्प यांच्या 15 टक्के टॅरिफच्या निर्णयानं आणि अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवण्याच्या निर्णयामुळं अनिश्चित झालेल्या स्थितीमुळं बाजारावर परिणाम झाला. भारताचं चलन असलेला रुपया पुन्हा एकदा कमजोर ठरला.