नरडाणा पोलिसांची मोठी कामगिरी : वीज पोलवरील अॅल्युमिनिअम तार चोरी करणारी राजस्थानसह गुजरातची टोळी जाळ्यात
सहा आरोपींना अटक : दहा लाखांच्या वाहनासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
Big achievement by Nardana police: Gang from Rajasthan and Gujarat caught stealing aluminum wires from electricity poles नरडाणा, ता.शिरपूर (24 फेब्रुवारी 2026) : विद्युत प्रवाह खंडीत करून वीज कंपनीच्या पोलवरील अॅल्युमिनिअम तारा लांबवणारी गुजरातसह राजस्थानमधील सहा चोरट्यांची टोळी पकडण्यात नरडाणा पोलिसांना यश आले आहे. आरोपींच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून दहा लाखांच्या वाहनासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये नारायणसिंग राजुसिंग (38, रा.देबीपुरा केरीया, ता.मांडल, जि.भिलवाडा, राज्य राजस्थान), लोकेश बन्सीसिंग रावत (22, रा.देबीपुरा केरीया, ता.मांडल, जि.भिलवाडा), हिरासिंग धनासिंग रावत (28, रा.छाजवो का खेडा केरिया, ता.मांडल, जि.भिलवाडा, राजस्थान), प्रकाशसिंग लालसिंग रावत (28, रा.भेरुखेडा, ता.मांडल, जि.भिलवाडा, राज्य राजस्थान), भवानीसिंग लालसिंग रावत (30, रा.भेरुखेडा, ता.मांडल, जि.भिलवाडा, राज्य राजस्थान), राधेशाम गणेशसिंग रावत (रा.मोटी, ता.बदनोर, जि.भिलवाडा, राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे चोरी प्रकरण
20 ते 24 जानेवारीदरम्यान रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान नरडाणा 132 के.व्ही. सबस्टेशन बेटावद रोड समोरील विजेच्या पोलपासून ते नरडाणा-मेलाणे रोड दरम्यानच्या मेलाणे गावाच्या अलीकडील 42 गाळ्यांच्या विजेच्या पोलवरील रामा फॉस्फेट लि.नरडाणा, एम.आय.डी.सी.वारुड, ता.शिंदखेडा या कंपनीला वीजपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेली अॅल्युमिनिअम विद्युत तार (कंडक्टर) चोरट्याने विजेचे पोल वरुन कट करुन लांबवली होती. या प्रकरणी आदित्य किशोर पोतदार (रा.लेन नं.5, रथगल्ली, जय जवान चौक, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल होता. सी.सी.टी.व्ही.फुटेज तसेच घटनास्थळावरील डमडाटा काढून तांत्रिक पध्दतीने तपास केल्यानंतर संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या तीन दिवसीय पोलिस कोठडीत त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल 350 कि.मी. अंतरावरील गुजरात राज्यातील वडोदरा येथील हितेशसिंह उर्फ इकतेश्वर नरेंद्रसिंह यास विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर संशयीताने चोरीचा माल विकत घेतल्याची कबुली देत हा माल नरडाणापासून सुमारे 700 कि.मी. अंतरावरील सुमरा निसार अहमद उस्मानभाई (रा.लाठी, जि.अमरेली, राज्य गुजरात) यास विक्री केल्याची कबुली दिली. या संशयीताचा शोध सुरू आहे.
14 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून तीन लाख 75 हजार रुपये किंमतीची विद्युत अॅल्युमिनीयम तार, 10 लाख रुपये किंमतीचे वाहन (आर.जे.06 जी.सी. 7265), 30 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, 10 हजार रुपये किंमतीचे कटर, लोखंडी झुले, लोखंडी पकड, इलेक्ट्रीक वजन काटा जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक रवींद्र महाले, सायबर सेल उपनिरीक्षक संजय पाटील नरडाणा पोलिस ठाण्याचे हेमंत पाटील, हवालदार ललित पाटील, भरत चव्हाण, योगेश गीते, विक्रांत देसले, नारायण गवळी, चंद्रकांत साळुंके, रईस शेख, रवींद्र मोराणीस, अनारसिंग पवार, भुरा पाटील, विजय माळी, दीपक भामरे, विनोद कोळी, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल, सुनील गावीत, चालक सुरजकुमार सावळे आदींच्या पथकाने केली.