साळशिंगीत धाडसी घरफोडी : दोन लाखांचे दागिने लांबवले


बोदवड (25 फेब्रुवारी 2026) : बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले.

बंद घराला टार्गेट
समाधान पोपट पाटील (62, रा.साळशिंगी, ता.बोदवड) हे शेती करतात. रविवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 23 फेब्रुवारी रोजी सकाळी सहावाजेदरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील मौल्यवान दागिने घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी एकूण एक लाख 90 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला.


समाधान पाटील यांनी सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल केला. तपास पोल्लिस उपनिरीक्षक गजानन राहटे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !