यावलला कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले गोवंश पकडले : एकाविरूध्द गुन्हा


Cows tied for slaughter in Yavala caught : Crime against one यावल (25 फेब्रुवारी 2026) : यावल शहरातील बाबानगरात एका ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बांधले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकत सात गोवंश ताब्यात घेत त्यांची सुटका केली. गोवंशाची गो शाळेत रवानगी करण्यात आली असून एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
शहरातील चोपडा रस्त्यालगत असलेल्या बाबानगरात अलताफ कुरेशी यांच्याकडे कत्तलीच्या उद्देशाने गोवंश एका ठिकाणी बांधुन ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. शुक्रवारी सांयकाळी पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार पुरूषोतम पाटील, विनोद चौधरी, अर्षद गवळी, राजेंद्र पाटील, गणेश गडकर व होमगार्ड असे पथक बाबानगरात गेले व तेथुन त्यांनी दोन गायी, एक वासरी व चार वासरू मिळून एक लाख पाच हजार रूपये किंमतीचे सात गोवंश पकडले.


गोवंशाची निमगावातील गोशाळेत रवागनी करण्यात आली. या प्रकरणी अलताफ कुरेशीविरूध्द प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !