गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक : सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवा : जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे


Branches in every village, soldiers in every house: Let the army carry the thoughts of Anandraj Ambedkar to every house : District President Vinod Sonawane भुसावळ (25 फेब्रुवारी 2026) : हा केवळ निवडणुकांचा लढा नसून दलित, मुस्लिम, बहुजन, आदिवासींच्या स्वाभिमानाचा एल्गार आहे. आतापर्यंत ज्यांनी आमचा वापर केला, त्यांची झोप उडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने आता घराघरात सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्य पोहोचून गाव तिथे शाखा व घर तिथे रिपब्लिकन सैनिक तयार करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी येथे केले. शहरातील अष्टभुजा मंदिर समोरील कॉम्प्लेक्समध्ये रिपब्लिकन सेनेची भव्य जिल्हास्तरीय बैठक झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

या पदाधिकार्‍यांवर जवाबदारी
रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिवपदी अरुण तायडे, जळगाव तालुका अध्यक्षपदी अनिता सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष (दक्षिण) पदी लिलाधर सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, दिनेश इखारे आदींनी मार्गदर्शन केले.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा महासचिव (महिला सेना) वंदना आराक, भडगाव तालुकाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर, हेमंत सोनवणे (जळगाव), बंटी नरवाडे, दीपक इंगळे (उचंदा), कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, शर्मिला तायडे, राजेंद्र बारी, सिध्दार्थ पारधे, खैरनार (भडगाव), पारोळा तालुकाध्यक्ष गौतम पवार, जामनेर तालुकाध्यक्ष रवी मोरे, प्रशांत तायडे (न्हावी), रिपब्लिकन सेना आयटी सेल प्रमुख स्वप्नील सोनवणे, प्रशांत तायडे (वरणगाव), बंटी सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !