दुचाकी चोरणारी सायगव्हाणची टोळी जाळ्यात : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई


Saigavan’s gang of bike thieves caught : Jalgaon Crime Branch takes action जळगाव (25 फेब्रुवारी 2026)  : दुचाकी चोरी करणार्‍या तीन गुन्हेगारांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपींच्या ताब्यातून चोरीची स्कुटी, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीन आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये मनोज छोटू मोरे (19, रा.सायगव्हाण), आदित्य बाजीराव वाघ (21, रा.सायगव्हाण) व विनोद रामदास सौदाणे (19, रा.सायगव्हाण) यांचा समावेश आहे. मोरे यास श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली.


कन्नड तालुक्यातील आरोपी जाळ्यात
फिर्यादी गणेश तानाजी गवळी यांची स्कुटी आणि मोबाईल गुरुवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री चोरीला गेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. या पथकाने सायगव्हाण (ता. कन्नड) येथील तीन संशयितांना अटक केल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कारवाईत हवालदार संदीप पाटील, कॉन्स्टेबल सागर पाटील, चालक बाबासाहेब पाटील यांचा सहभाग होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !