आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्या तरुणावर हवी कारवाई : यावलला भाजपाचे निवेदन
Action should be taken against the youth who posted an offensive status: BJP’s statement to Yawal यावल (25 फेब्रुवारी 2026) : यावल पोलिस ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी निवेदन देत आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवणार्या किनगावातील तरुणाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
काय आहे निवेदनाचा आशय
यावल पोलिसात निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील, किनगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय पाटील, मयूर पाटील यांनी एकत्रित येऊन निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, किनगाव खुर्द येथील रहिवासी सरफराज युनूस पिंजारी हा तरुण नेहमीच सामाजिक भावना भडकतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकत असतो तसेच स्टेटस ठेवत असल्याने गावात शांतता भंग होईल व दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी स्थिती निर्माण होते. नुकतेच त्याने अशाच प्रकारची एक पोस्ट ठेवली आहे व यापूर्वीदेखील त्याने अशाच प्रकारची कृत्य केल्याने त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल आहे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे.
