भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात समूहगीत गायन


K. Narkhede School भुसावळ (26 फेब्रुवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी हिंद दी चादर अंतर्गत गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समारंभ अंतर्गत गुरु तेगबहादुर साहेब जी यांच्या जीवनपटावर आधारित भक्ती गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी डी.जी.जाधव, नायब तहसीलदार हेमंत गुरव, भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, भुसावळ तालुका पंचायत समितीचे विषयतज्ञ संजय गायकवाड, मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठकर, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या गुरु तेगबहादूर साहेब जी यांच्या जीवनपटावर आधारित भक्ती गीताचे सामुदायिक गायन केले.


विद्यार्थ्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन
संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे, एम.व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सुस्वर गीत सादर केले. प्रमुख अतिथी डी.जी.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरु तेग बहादुर साहेब जी यांचे महान कार्य सांगितले व विद्यार्थ्यांच्या सामुदायीक गीत गायनाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. एस.एम.चिपळूणकर यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास के. नारखेडे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संगणक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !