भुसावळातील एन.के.नारखेडे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ‘फायर अ‍ॅण्ड सेप्टी’चे धडे


Students at N.K. Narkhede School in Bhusawal receive lessons on ‘Fire and Septic’ भुसावळ (26 फेब्रुवारी 2026) : आग लागण्याची कारणे, आगीबद्दल असणारी भीती, आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याकरिता लागणारी उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण विद्यार्थांना प्रात्यक्षिकातून शहरातील एन.के.नारखेडे स्कूलमध्ये शिकविण्यात आले. अग्निशमन यंत्रणा हाताळतांना कोणती काळजी घेतली पाहिजे. अग्निशमन यंत्रणेचा वापर किती वेळेपर्यंत करावा, तसेच अग्निशमन यंत्रणा हाताळण्याची योग्यपद्धत याविषयी उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी हाताळले यंत्र
शहरातील के. नारखेडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अग्निशामक प्रशिक्षण घेण्यात आले. प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्तावना शबनम तडवी यांनी केली. भुसावळ नगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी रवींद्र पाटील, रायपुरे तसेच गौरव पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आगीपासून स्वतःला कसे वाचवू शकतो ? या विषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे यांनी अग्निशामक दलाचे सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !