मराठी भाषा म्हणजे साहित्याची खाण होय : प्राचार्य डॉ.रमेश जोशी
भुसावळ (27 फेब्रुवारी 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शुक्रवार, 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव म्हणून साजरा करण्यात येतो. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रमेश जोशी होते.
संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सर्वांना जगण्यासाठी उपयुक्त
आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थी मित्रांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. तसेच संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे सर्वांसाठी उपयुक्त आहे व संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सर्वांना जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशातील अनेक भाषेत मराठी ही भाषा अधिक समृद्ध व श्रीमंत अशी आहे. ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. कवी मुकुंदराज यांच्या विवेकसिंधु या ग्रंथातून 5व्या शतकाचे उल्लेख सापडतात. यानंतर खर्या अर्थाने श्री ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीतून , समर्थ रामदास, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक थोर व्यक्तींनी या भाषेला समृद्ध केले आहे. म्हणून सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर अवश्य केला पाहिजे असे आवाहन केले.



प्रा.अनुपम शर्मा यांनी कवी कुसुमाग्रजांची कणा कविता याविषयी माहिती सांगितली. तसेच प्रा. कविता पांडव यांनी कवी कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान याविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमा त महाविद्यालय तर्फे सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या निबंध स्पर्धा तसेच गद्य वाचन स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमात त प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. ज्योती ओस्तवाल व आभार प्रदर्शन प्रा. अनुपम शर्मा यांनी मानले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.