शिंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात


Cultural program in Shindi Zilla Parishad Primary School in full swing भुसावळ (27 फेब्रुवारी 2026)  : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कलागुणांना मिळाली दाद
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर देशभक्ती गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, आदिवासी नृत्य आणि विविध गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.




या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपशिक्षिका प्रीती फेगडे ,माधुरी चौधरी, उपशिक्षक दीपक सुरवाडे, शाळेतील माजी मुख्याध्यापक भगवान बडगुजर, माजी उपशिक्षक समाधान जाधव उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कांचन परदेशी, समिती सदस्य बन्सिलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, ग्रामस्थ, पालक प्रवीण सुरवाडे, पुंडलिक पाटील, कुंदन राजपूत, अमर शिराळे, राहुल पाटील उपस्थित होते. महिलावर्ग शितल पाटील, अर्चना कोळी ,सुनिता पाटील, शितल निकम, कोमल पाटील, प्रमिला पाटील, संगीता महाजन ,नंदा सोनवणे, नंदा निकम, मीरा जाधव, माया शिराळे, जयशीला पाटील, उर्मिला राजपूत, माधुरी सुरवाडे, शितल सपकाळे, सुरेखा नरवाडे,आशा कोळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमासाठी मोफत स्टेज व मंडप शाळेचे माजी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी उपलब्ध करून दिले, तर साऊंड सिस्टीमची व्यवस्था माजी विद्यार्थी ललित परदेशी यांनी केली. मागील दहा वर्षांपासून दोघेही शाळेला सातत्याने सहकार्य करत असून त्यांच्या या योगदानाबद्दल ग्रामस्थ, पालक व महिलावर्ग यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुंदर पर्व जोडले गेले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !