पुण्यातील नऊ गुंड तडीपार

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई


Nine goons from Pune deported पुणे (27 फेब्रुवारी 2026) : पुणे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत माजविणार्‍या नऊ गुंडांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश त्यांनी काढल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या गुन्हेगारांवर कारवाई
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये जालिंदर मसा मोरे (48, रा.अप्पर इंदिरानगर,पुणे), अण्णा ऊर्फ गणराज सुनील ठाकर (26, रा.अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (23, रा.बिबवेवाडी, पुणे), राजु महादेव डेंगळे (22, रा. सुखसागर नगर, पुणे), आकाश गुलाबराव कांबळे (21), कृष्णा बबन लोखंडे (24), आर्यन बापु बेलदरे (24, रा.आंबेगाव बुद्रुक,पुणे), सोमगौडा गुरन्ना चौधरी (33, रा. मार्केटयार्ड, पुणे), साहिल भिमा अष्टगे (20, रा.मार्केटयार्ड, पुणे) यांचा समावेश आहे.




या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे आणि मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिक भयभीत झाले होते, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !