ब्लॅक फ्रायडे : शेअर मार्केट क्रॅश ; गुंतवणूकदारांचे पाच हजार कोटी बुडाले

Black Friday : Stock market crashes; Investors lose Rs 5,000 crore मुंबई (27 फेब्रुवारी 2026) : भारतीय शेअर बाजारात शुक्रवार, 27 फेब्रुवारीला मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 961 अंकांनी तर निफ्टी 50 मध्ये 317 अंकांची घसरण झाली. जागतिक बाजारातील कमजोर संकेत, भू राजनैतिक तणाव, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री याचा परिणाम बाजारावर दिसून आला.

शुक्रवारी दुपारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 961.42 अंकांनी घसरुन 81287.19 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 निर्देशांक 317.90 अंकांनी घसरुन 25178.65 अंकांवर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांनी घसरले.

शेअर बाजारात सर्वत्र घसरण पाहायला मिळाली आयटी आणि मीडिया निर्देशांक सोडून इतर सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, बँक, एफएमसीजी, मेटल, रिअल्टी, टेलिकॉम क्षेत्रातील निर्देशांकात 1-2 टक्के घसरण जाली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1 ते 2 टक्क्यांनी घसरला.

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 468.49 लाख कोटींवरुन 463.51 लाख कोटींवर आलं. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4.98 लाख कोटी रुपयांनी घटले.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !