पंकजा मुंडेंच्या आदेशाचे उल्लंघन भोवले : आयएएस अधिकारी देवेंद्र सिंग निलंबित


मुंबई (8 फेब्रुवारी 2026) : पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याबद्दल 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात आल्याने प्रशासकीयआले आहे. सिंग सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत.

काय आहे प्रकरण ?
विधानसभेतील चर्चेदरम्यान पंकजा मुंडे यांनी ब्रीफिंगसाठी बोलावले असता सिंग यांनी येण्यास नकार दिला होता. तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी या वर्तनाची दखल घेत निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाने शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली होती. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय मुंबईच राहील आणि परवानगीशिवाय त्यांना शहर सोडता येणार नाही. या प्रकरणावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंत्र्यांना ब्रीफिंग देण्यास नकार देणे हा संविधानाचा अपमान आहे. काही अधिकार्‍यांमध्ये अहंकार वाढला असून, लोकप्रतिनिधींचा सन्मान राखणे आवश्यक आहे.




 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !