भुसावळ शहर खुनाने हादरले  : किरकोळ वादातून प्रौढाला संपवले

डोक्यात सिमेंटची कुंडी टाकल्याने प्रौढाचा मृत्यू ; संशयीताला अटक


Bhusawal city shaken by murder: Adult killed over minor dispute भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शाब्दीक वाद प्रौढाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना भुसावळातील नेब कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. प्रौढाच्या खुनानंतर शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (43, भुसावळ) यांचा मृत्यू ओढवला असून संशयीत रोहित पुरूषोत्तम भावसार (नेब कॉलनी, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय घडले भुसावळात ?
भुसावळातील आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात अनिल सावकारे यांचा संशयीत रोहित भावसारची काहीतरी बोलण्यावरून वाद झाला. पाहता पाहता शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. संशयीताने संतापात सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.




पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी संशयीताला अटक केली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीने सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !