भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात
भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग अंतर्गत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.डॉ.दीपक पाटील यांनी केले. मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास यासाठी प्रत्येक मराठी माणसाने संकल्प करण्याचा दिवस आहे. मराठी साहित्याची समृद्धता, सौंदर्य आणि भाषिक विविधता नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे भाषा गौरव दिनाचे उद्दिष्ट आहे, असे सांगितली.तसेच कवी वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्यात मानवी भावना, क्रांती आणि सामाजिक जाणिवा असल्याचे सांगितले. मराठी भाषेला सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.मराठी भाषेचा उगम आणि विकास गौरवशाली आणि समृद्ध आहे.


अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी मराठी भाषा गौरव दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेचा ठेवा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हे आपणासाठी अभिमानाची बाब आहे. त्यासाठी आजच्या युगात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मराठी भाषा ही तंत्रज्ञानाची आणि व्यवहाराची भाषा होणे गरजेचे आहे. असे अध्यक्षीय मनोगत सांगितले .महाविद्यालयातील कु. लक्ष्मी तायडे, अनुष्का आंबेकर या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले.
सूत्रसंचलन प्रा.प्रिया लोहार तर आभार प्रा.जोगेश्वरी पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास मराठी विभागातील डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.गौतम भालेराव, प्रा.मनोहर गायकवाड, प्रा.सतीश अहिरे यांचे अनमोल सहकार्य लाभले. प्रा.डॉ.एस.टी.धूम, प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.जितेंद्र आडोकार, प्रा.सुनील अडकमोल, प्रा.डॉ.नीलिमा पाटील, प्रा.डॉ.प्रियंका महाजन, प्रा.डॉ.शलाका निकम उपस्थित होते.
यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.