भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञानदिन उत्साहात
भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शहरातील कोलते फाउंडेशनच्या द वर्ल्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा झाला. सुरुवात संचालक सी.ए.रोहित कोलते व मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांच्याहस्ते सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते सर यांनी नव्या विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनी व वर्किंग मॉडेल्स सादर करून माहिती दिली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत विज्ञानविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रम मुख्याध्यापिका पेट्रिशा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभागप्रमुख लक्ष्मणसिंग ठाकूर व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वी झाला.

