भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन
भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस, सीएमए करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन सोमवार, 2 मार्च 2026 रोजी दुपारी चार वाजता महाविद्यालयातील डी-53 या वर्गात मंत्री संजय सावकारे, सीए अर्पित काबरा (सीसीएमआय, सीएआय, न्यू दिल्ली) यांच्याहस्ते होत आहे.
यांची असेल उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ.मोहनजी फालक असतील. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सीए हितेश आगीवाल (चेअरमन डब्ल्यू.आय.आर.सी.जळगाव), सीए मुकेश अग्रवाल (भुसावळ), महेश फालक (चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी), विष्णूज चौधरी (सचिव ताप्ती एज्युकेशन सोसायटी), संजय नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील उपस्थित राहणार आहेत.


यांचे उपक्रमासाठी सहकार्य
ही अभ्यासिका आय.सी.ए.आय, न्यू दिल्ली, जळगाव शाखा यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघटनेस मिळाली आहे. अशा प्रकारची अभ्यासिका नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेस मिळावी म्हणून नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भुसावळचे सीए मुकेश अग्रवाल यांचे विशेष अनमोल असे योगदान आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ.आशिष चौधरी, कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील, डॉ.चंद्रकांत सरोदे, डॉ.गौरी पाटील, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, मुकेश फिरके, भगवान तायडे, सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.