डिजिटल बँकिंग व डिजिटल इकॉनोमीत सहभागी होताना सातत्यपूर्ण सावधानी अत्यावश्यक : हारुण उस्मानी


भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि मराठी विभागांतर्गत मराठी भाषा गौरव दिन तसेच नियोजन अभ्यास मंडळाची उद्घाटन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे प्रसिद्ध गझलकार हारुण उस्मानी होते. प्रमुख उपस्थितांमध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.टी.धुम आणि मराठी विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ.डी एन पाटील यांची होती.

तंत्रज्ञानाचे जसे फायदे तसे तोटेही
हारुण उस्मानी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी गझलकार शेख एजाज यांची गझल सादर केली. यावेळी डिजिटल बँकिंग व डिजिटल करन्सी ह्या विषयावर बोलताना त्यांनी सुविधेसाठी सर्व जग ही डिजिटल इकॉनोमीकडे वळत आहे. अर्थात तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात त्यामुळे डिजिटल बँकिंग व डिजिटल इकॉनॉमी चा भाग बनत असताना प्रत्येकाने सातत्यपूर्ण जागरूक राहणे व काळजी घेणे ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले.



धातू पैशापासून आभासी पैशापर्यंत जगभरातील अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मानवी जीवन व मानवी व्यवहार सुखमय करण्यासाठी जरी असला तरी त्याच्या काही त्रृटीदेखील आहे. त्या त्रृटी एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात त्यामुळे आपल्या धोकादायक बाबी कमीत कमी कशा करता येईल या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान वापरताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेची अस्मिता जपा
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांनी महाराष्ट्र हा सर्व समुदाय, जाती, धर्म, पंथ यांच्या एकत्रीत प्रयत्नातून उभा राहिला आहे आणि भारतात तो त्याच्या सहिष्णुतेसाठी ओळखला जातो असे असले तरी मराठी माणूस ही संज्ञा सर्व धर्म जात-पात पंथ यातील भेद मिटून सर्वांना एकत्रित करते त्यामुळे मराठी भाषेची अस्मिता आपण जपली पाहिजे, त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे मत नमूद केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.टी.धूम तथा प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्रिया लोहार यांनी केले. आभार प्रा.जोगेश्वरी पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.विलास सोळुंके, प्रा.डॉ.जे.पी.आडोकार, प्रा.सुनील अडकमोल, प्रा.डॉ.दीनानाथ पाठक, प्रा.गौतम भालेराव, प्रा.सतीश अहिरे, प्रा.डॉ.शलाका निकम यांच्यासह ऋचा मिटकरे, नयना पाटील, फाल्गुनी चौधरी, आश्विनी गुरव, तेजस्विनी पाटील, राशि मेने आणि अमोल गुजर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !