भुसावळातील आमदारांचे दातृत्व : पूरग्रस्तांसाठी दिड लाखांची मदत


महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द

भुसावळ : महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित जाहीर सभेत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दिड लाखांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह शहरातील विविध संस्था व संघटनांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश प्रसंगी दिले.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार गुरूमुख जगवाणी, जिल्हाध्यक्ष संजवी पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, गटनेता मुन्ना तेली, उद्योजक मनोज बियाणी, विजय चौधरी, अजय भोळे, युवराज लोणारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.