भुसावळात पतंजली ज्येष्ठ नागरिक संघात तालुका विधी सेवा समितीचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर


भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) :  स्व.बाळासाहेब उद्यान महादेव मंदिरात 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पतंजली ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. अध्यक्षस्थानी पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग हरणकर, कोषाध्यक्ष अविनाश श्रावगे यांच्यासह बाविस्कर व भोसले उपस्थित होत्या. शिबिरात रिटेनर अ‍ॅड.निलेश भंडारी, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, संचालक चंदन नागराजन, बी.एस.पाटील, डी.एस.पाटील, भाऊराव सोनवणे, भास्कर वनाजी चित्ते, महिला पदाधिकारी बाविस्कर, भोसले उपस्थित होत या. शिबिरात रिटेनर अ‍ॅड. निलेश भंडारी व अ‍ॅड.जास्वंदी भंडारी यांनी मार्गदर्शन केले.



अ‍ॅड.नलेश भंडारी यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, संवेदनशीलता व पुनर्वसन, अमली पदार्थांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती व पुनर्वसन सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली. एलजीबीटीए समुदाय सदस्यांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदत व सहाय्य योजनांविषयी विशेष मार्गदर्शन केले.

अ‍ॅड.जास्वंदी भंडारी यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी माहिती देताना ज्येष्ठांनी आपल्या मालमत्तेची व संपत्तीची काळजी कशी घ्यावी, मृत्युपत्र कसे तयार करावे, वारसा हक्कासंबंधी माहिती तसेच कौटुंबिक वादातून उद्भवणार्‍या अडचणी यावर प्रकाश टाकला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत समाधान केले.

कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा समितीच्या समांतर विधी सहाय्यक तथा पीएलव्ही उज्वला बागुल यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा समितीच्या कार्याचे महत्त्व विषद केले. समिती गरजू व वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवते. लोकअदालतीचे आयोजन, कायदेविषयक जनजागृती, समुपदेशन व मध्यस्थी, विशेष घटकांना सहाय्य, कैद्यांना कायदेशीर मदत आदी उपक्रमांद्वारे सर्वांसाठी न्याय सुनिश्चित करण्याचे कार्य समिती करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कायदेविषयक माहिती पत्रके देऊन जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगता संघ संचालक डी.एस.पाटील यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !