होळी पर्वात रेल्वे प्रवाशांना दिलासा : भुसावळ-खंडवा व देवळाली-नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या धावणार


Relief for railway passengers during Holi festival : Unreserved MEMU special trains will run between Bhusawal-Khandwa and Deolali-Navi Amravati भुसावळ (28 फेब्रुवारी 2026) : होळीच्या पावन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनामार्फत भुसावळ-खंडवा व देवळाली-नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
चा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. तपशील पुढीलप्रमाणे –

भुसावळ-खंडवा अनारक्षित मेमू विशेष गाडी (सहा फेर्‍या)
गाडी क्रमांक 01102 (अनारक्षित विशेष) 2, 3 व 4 मार्च रोजी भुसावळ येथून पहाटे 5.50 वाजता सुटेल आणि खंडवा येथे सकाळी 7.55 वाजता पोहोचेल.



गाडी क्रमांक 01101 (अनारक्षित विशेष) 1 ते 3 दरम्यान खंडवा येथून सायंकाळी 5.10 वाजता सुटल्यानंतर भुसावळात रात्री 8 वाजता पोहोचेल. या गाडीला नेपानगर, बर्‍हाणपूर, रावेर, निंभोरा व सावदा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

देवळाली-नवी अमरावती अनारक्षित मेमू विशेष गाडी (सहा फेर्‍या)
गाडी क्रमांक 01103 (अनारक्षित विशेष) 2 ते 4 मार्चदरम्यान देवळाली येथून दुपारी 1.35 वाजता सुटल्यानंतर नवी अमरावती येथे रात्री 9.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01104 (अनारक्षित विशेष) 3 ते 5 मार्चदरम्यान नवी अमरावती येथून पहाटे 5.20 वाजता सुटेल आणि देवळाली येथे दुपारी 12.40 वाजता पोहोचेल. या गाडीला नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोडवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा स्थानकावर थांबा असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !